chumbaleshwar mandir narayangavhan
पारनेर : सोमवार दि. २० एप्रिल २०२६ रोजी नारायणगव्हाण येथील श्री क्षेत्र चुंबळेश्वर महादेव मंदिर परिसराच्या सर्वांगीण विकासाला गती देणारा महत्त्वपूर्ण उपक्रम उत्साहात पार पडला. पारनेर-नगर विधानसभा मतदारसंघाचे आमदार काशिनाथ दाते सर यांच्या सातत्यपूर्ण पाठपुराव्यातून पर्यटन विकास निधीतून मंजूर झालेल्या सुमारे ४० लाख रुपये खर्चाच्या भव्य कीर्तन मंडप बांधकामाचे भूमिपूजन विधीवत संपन्न झाले.Naarayanganvhan chumbaleshwar kirtan mandap bhumipujan
या मंडपामुळे मंदिर परिसरात धार्मिक कार्यक्रम, कीर्तन, भजन, प्रवचन, हरिपाठ तसेच विविध सांस्कृतिक उपक्रमांसाठी सुसज्ज आणि प्रशस्त व्यवस्था उपलब्ध होणार आहे. त्यामुळे भाविकांना अधिक सोयीस्कर सुविधा मिळणार असून, गावातील धार्मिक वातावरणालाही नवसंजीवनी मिळणार आहे.
चुंबळेश्वर महादेव मंदिर परिसरात उभारण्यात येणारा हा कीर्तन मंडप केवळ धार्मिक कार्यक्रमांसाठीच नव्हे, तर गावाच्या सामाजिक आणि सांस्कृतिक उपक्रमांसाठीही महत्त्वाचा ठरणार आहे. या मंडपामुळे बाहेरगावाहून येणाऱ्या भाविकांची संख्या वाढण्याची शक्यता असून, स्थानिक पातळीवर रोजगार आणि व्यवसायाच्या संधीही उपलब्ध होणार आहेत.
यावेळी बोलताना आमदार काशिनाथ दाते सर म्हणाले,
“आपल्या तालुक्यातील देवस्थानांचा विकास हा केवळ श्रद्धेचा भाग नसून, तो ग्रामीण भागाच्या प्रगतीशी थेट जोडलेला आहे. चुंबळेश्वर मंदिरासारख्या ठिकाणांचा विकास केल्यास येथे येणाऱ्या भाविकांची संख्या वाढेल, स्थानिकांना रोजगाराच्या संधी उपलब्ध होतील आणि गावाच्या आर्थिक व सामाजिक विकासाला चालना मिळेल. पर्यटन विकासाच्या माध्यमातून आपल्या भागातील परंपरा आणि संस्कृती जतन करत विकास साधण्याचा आमचा प्रयत्न कायम राहील.”
या प्रसंगी सुनील थोरात, बाळासो कळमकर, सुरेश बोरुडे सर, संतोष गायकवाड, खिवंसरा काका, सहादू शेळके, बंडोपंत नाईक, तारा दरेकर, संजय शेळके, दादासाहेब शेळके, विकास पवार, हुसेन शेख, गणेश शेळके, हेमंत कांडेकर, सौ. मनीषा जाधव, सविता भोसले, श्रीमती अनुसया कांडेकर, अण्णा चव्हाण, बाळासाहेब चव्हाण, भरत भोसले, मेजर काशिनाथ नवले, प्रताप अंबुले, सौ. उषा संजय शेळके, सौ. कामिना विकास पवार आदी मान्यवर तसेच ग्रामस्थ मोठ्या संख्येने उपस्थित होते.
भूमिपूजन सोहळ्यानंतर नारायणगव्हाण गावात उत्साहाचे वातावरण निर्माण झाले असून, या कामामुळे चुंबळेश्वर मंदिर परिसर अधिक आकर्षक, सुविधायुक्त आणि भाविकांसाठी उपयुक्त होणार असल्याची भावना ग्रामस्थांनी व्यक्त केली.
कीर्तन मंडप उभारणीमुळे आगामी काळात मोठ्या प्रमाणावर धार्मिक कार्यक्रम, जत्रा, महाप्रसाद, प्रवचने आणि कीर्तन सोहळे आयोजित करणे अधिक सोपे होणार आहे. त्यामुळे नारायणगव्हाण गावाच्या धार्मिक पर्यटनाला चालना मिळण्यास मदत होणार असून, चुंबळेश्वर देवस्थानला नव्या ओळखीची जोड मिळणार आहे.
चौकट
“आमदार काशिनाथ दाते सरांनी नारायणगव्हाणसारख्या ग्रामीण भागातील देवस्थानाच्या विकासासाठी घेतलेली पुढाकार खरोखर कौतुकास्पद आहे. चुंबळेश्वर मंदिरासाठी कीर्तन मंडप उभारणीमुळे भाविकांना मोठी सुविधा मिळणार आहे. सरांनी केवळ आश्वासने न देता प्रत्यक्ष कामातून विकास घडवून आणला आहे, याचे समाधान वाटते. त्यांच्या या कामामुळे गावाच्या धार्मिक व पर्यटनदृष्ट्या प्रगतीला नक्कीच चालना मिळेल. पुढील काळातही अशाच पद्धतीने विकासकामे सुरू राहतील, असा विश्वास आहे.”
– सुरेश बोरुडे सर, माजी सरपंच, नारायणगव्हाण
संपादक : प्रकाश धोत्रे
पत्रकार : शिवशंकर शिंदे
